दक्षिण मध्य रेल्वेत 4103 जागांसाठी अप्रेंटिस भरती सुरू | South Central Railway Recruitment

मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे यांच्या वतीने अप्रेंटिस पदाच्या एकूण 4103 जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांकरिता ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. South Central Railway यांच्यावतीने राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया अप्रेंटिस या पदाकरिता असणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व इतर सर्व माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

South Central Railway Recruitment यांच्या वतीने प्रशिक्षणार्थी पदांच्या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआय झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही दहावी पास आयटीआय उमेदवारासाल तर भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाकरिता अर्ज करू शकतात.

मित्रांनो भारतीय रेल हे आपल्या देशातील महत्त्वाची सरकारी रेल कंपनी आहे. जर तुम्ही नुकताच आयटीआय केलेला असेल आणि जर तुम्हाला अप्रेंटिस करायचे असेल तर तुम्ही ज्या ट्रेड मध्ये आयटीआय केलेला आहे. त्या ट्रेड नुसार या अप्रेंटिस भरती अंतर्गत पदाकरिता अर्ज करू शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी करू शकतात. South Central Railway Recruitment 2023 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाच्या कालावधीपर्यंत शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीवर ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमानुसार शिकाऊ उमेदवारांकरिता असलेले वेतन सुद्धा देण्यात येणार आहे.

वनरक्षक भरती पात्रता; वनरक्षक भरती शैक्षणिक, शारीरिक पात्रता

दक्षिण मध्य रेल्वे रिक्रुटमेंट तपशील South Central Railway Recruitment Details:

एकूण जागा: 4103

पदांचे नाव: अप्रेंटिस

फी: 100रू(अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती व दिव्यांग उमेदवारांना फी नाही)

शैक्षणिक पात्रता:
1. दहावी पास
2. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा: 15 ते 24 वर्ष (मागासवर्गीयांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये शितलता)

अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 जानेवारी 2023

नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वे युनिटमध्ये

रेल्वे अधिकृत वेबसाईट: ही आहे 

दक्षिण मध्य रेल्वे भरती अधिकृत नोटिफिकेशन:

मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अप्रेंटिस भरतीची अधिकृत नोटिफिकेशन ही त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. दक्षिण मध्य रेल्वे भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता पात्र असलेल्या उमेदवारांनी भरतीशी संबंधित सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता याविषयी विस्तृत माहिती नोटिफिकेशन मधून वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा. दक्षिण मध्य रेल्वे भरती अधिकृत नोटिफिकेशन आणि तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. 

Check South Central Railway Recruitment Notification 

वरील लिंक वरून दक्षिण मध्य रेल्वे भरतीची अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावी.

दक्षिण मध्य रेल्वे भरती अंतर्गत आवश्यक पात्रता Eligibility Required under South Central Railway Recruitment :-

दक्षिण मध्य रेल्वे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया करिता खालील पात्रता ठरवून देण्यात आलेली आहे.

1. उमेदवार हा किमान 55 टक्के गुण मिळवून दहावी पास असावा.
2. उमेदवाराचा आयटीआय झालेला असावा.
3. उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा
4. उमेदवार हा भारताचा रहिवासी असावा

वरील पात्रता दक्षिण मध्य रेल्वे भरती अंतर्गत ठरवून देण्यात आलेले आहे.

दक्षिण मध्य रेल्वे भरती करिता अर्ज कसा करायचा? How to Apply for South Central Railway Recruitment?

मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे भरती अंतर्गत जर तुम्ही इच्छुक व पात्र उमेदवार असाल तर तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अधिकृत वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मिळालेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून तुम्ही ज्या पदाकरिता पात्र आहात त्या पदाकरिता अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने त्याच पोर्टलवर पेड करायची आहे. अर्जाची फी प्राप्त झालेलेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची लिंक- 

दक्षिण मध्य रेल्वे भरती अंतर्गत उमेदवारांकरिता सूचना:

1. या रिक्रुटमेंट अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचे आहेत.
2. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
3. उमेदवारांनी त्यांचा ऑनलाईन अर्ज हा 29 जानेवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
4. ही भरती अप्रेंटिस पदाकरिता आहे.

मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे भरती संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारच्या माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment