उत्तर पश्चिम रेल्वेत 2026 जागांकरिता अप्रेंटिस भरती सुरू |  North Western Railway Recruitment

मित्रांनो भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे विभागाच्या वतीने अप्रेंटिस पदाच्या 2026 जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. North Western Railway Recruitment 2023 अंतर्गत कमीत कमी दहावी पास असलेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून भरती करिता आवश्यक पात्रता तसेच भरतीच्या अटी व शर्ती व इतर सर्व माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

उत्तर पश्चिम रेल्वे विभागाच्या वतीने अप्रेंटिस पदाच्या भरती करिता भरतीची नवीन जाहिरात ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. जर तुम्ही दहावी पास व आयटीआय केलेले उमेदवार असाल ते रेल्वे भागामध्ये अप्रेंटिस करण्याची एक उत्तम संधी चालून आलेली आहे. उत्तर पश्चिम रेल्वे भरती अंतर्गत उमेदवारांकडून 10 फेब्रुवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

North Western Railway Department is conducting the recruitment process for 2026 Apprentice vacancies. Applications are invited online from the candidates who want to work in the Indian Railway Department within the last date. All information under North Western Railway Recruitment is as below.

उत्तर पश्चिम रेल्वे भरती तपशील North Western Railway Recruitment Details:-

एकूण जागा: 2026
पदांचे नाव: अप्रेंटिस( इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वायरमन/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)
शैक्षणिक पात्रता:
1. दहावी उत्तीर्ण
2. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
वयोमर्यादा: 15 ते 24 वर्ष (शासनाच्या नियमाप्रमाणे मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये शिथिलता लागू)
फी: 100(अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती व दिव्यांगांना फी नाही)
नोकरी ठिकाण: उत्तर पश्चिम रेल्वे युनिटमध्ये
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

उत्तर पश्चिम रेल्वे भरती महत्त्वाच्या तारखा North Western Railway Bharti Important Dates:

मित्रांनो उत्तर पश्चिम रेल्वे भरती अंतर्गत अप्रेंटिस करू इच्छिणाऱ्या तरुणांना या भरती संबंधात खालील तारखा माहीत असणे आवश्यक आहे.

1. अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 जानेवारी 2023
2. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2023
3. फी पेड करण्याची अंतिम तारीख: 10 जानेवारी 2023

जर तुम्ही उत्तर पश्चिम रेल्वे भरती अंतर्गत अर्ज करणार असाल तर वरील तारखा प्रमाणे तुम्हाला अर्ज आणि अर्जाची fee फेड करायची आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.

उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023 अंतर्गत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अंतिम तारखेच्या आत रेल्वे विभागाच्या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती https://nwr.indianrailways.gov.in या रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना उमेदवार ज्या पदाकरिता पात्र आहे त्याकरिता अर्ज करायचा आहे. गजानन विजय ट्रेड मध्ये आयटीआय केलेला आहे त्याच ट्रेड करिता पदांनुसार अर्ज सादर करायचा आहे.

उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023 अर्ज कसा आणि कुठे करायचा?

North Western Railway Recruitment 2023 अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्जासोबत उमेदवारांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची असून अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतरच तुमचा अर्ज सबमिट होणार आहे. या भरती संदर्भात सर्व महत्त्वाच्या तारखा लक्षात घेऊन उमेदवारांनी त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

अर्ज करण्याची वेबसाईट – येथे पहा 
अधिकृत नोटिफिकेशन – येथे करा

उमेदवारांची निवड प्रक्रिया:-

मित्रांनो या North Western Railway Recruitment 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही उमेदवारांना दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या मार्गाच्या आधारे तसेच आयटीआय मध्ये मिळालेल्या मार्गाच्या आधारे होणार आहे. जेवढे मार्ग दहावी मध्ये मिळालेले आहेत त्यांचे 50 टक्के मध्ये रूपांतर करून तसेच आयटीआय मधील मार्गाचे 50 टक्के मध्ये रूपांतर करून एकूण जे मार्क निघतील त्या टक्केवारीनुसार उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येईल.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना:

1. या भरती अंतर्गत उमेदवारांना 10 फेब्रुवारी 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
2. ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची प्रशिक्षणार्थी तत्त्वावर आहे.
3. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे.
4. भरती अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली भरतीची अधिकृत जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा.
5. उमेदवारांनी ज्या ट्रेड मध्ये आयटीआय केलेला आहे त्याच पदाकरिता अर्ज करावा.
6. उमेदवारी अर्ज हा अचूक पद्धतीने भरायचा असून चुकीचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
7. ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट बंद करण्यात येणार आहे, त्यामुळे तारखे नंतर अर्ज करता येणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023; मुलाखती द्वारे होणार निवड

उत्तर पश्चिम रेल्वे त्यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या 2026 जागांकरिता भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच भरती विषय तसेच जॉब विषयक अपडेट करीता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment