कर्नाटक बँक ऑफिसर भरती 2023 सुरू | Karnataka Bank Recruitment 2023

मित्रांनो कर्नाटक बँकेच्या वतीने ऑफिसर स्केल I या पदाच्या काही जागा करिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कर्नाटक बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Karnataka Bank Recruitment अंतर्गत कोण कोणते उमेदवार अर्ज करू शकतात. कर्नाटक बँक ऑफिसर भरती अंतर्गत उमेदवारांची पात्रता तसेच अटी व शर्ती व भरतीच्या संपूर्ण तपशील आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

कर्नाटक बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 84 हजार रुपये इतका पगार मिळणार आहे. Karnataka Bank Bharti अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करायचा आहे. कर्नाटक बँक भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 असून या अंतिम तारखेच्या आत पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करून त्यांच्या अर्जाची फी ऑनलाईन जमा करायची आहे. या पोस्टमध्ये आपण कर्नाटक बँक भरती बद्दलची संपूर्ण माहिती मराठी भाषेत जाणून घेणार आहोत.

On behalf of Karnataka Bank, applications are invited for the recruitment of the posts of Officers Scale-I. Below is the application process under Karnataka Bank Recruitment as well as details of posts, application fee and all other information.

 

 

कर्नाटक बँक भरती तपशील Karnataka Bank Recruitment Details:-

पदांची नाव: ऑफिसर(स्केल I)

शैक्षणिक पात्रता:

1. कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

2. एमबीए डिग्री

वेतन: 84000

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देश

वयोमर्यादा: 18 ते 28 वर्ष (अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता 03 वर्षे सूट)

फी: सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्ग 800 रुपये, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग 700 रुपये

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: लेखी पेपर

अधिकृत वेबसाईटयेथे पहा

 

कर्नाटक बँक भरती अर्ज कसा करायचा? How to Apply for Karnataka Bank Recruitment?

कर्नाटक बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती अंतर्गत सदर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. कर्नाटक बँकेच्या वतीने उमेदवारांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता आयबीपीएस च्या वेबसाईटवर अर्ज करण्याची आवाहन केले आहे. Karnataka Bank Recruitment 2023 अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर आम्ही तुम्हाला अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

ऑनलाइन अर्ज लिंक – 

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Karnataka Bharti Required Documents :-

Karnataka Bank Recruitment अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे खालील प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. आधार कार्ड

2. कास्ट सर्टिफिकेट

3. पदवीचे मार्कशीट

4. उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही

5. उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी (चालू असणारा)

वनरक्षक भरती पात्रता; वनरक्षक भरती शैक्षणिक, शारीरिक पात्रता

कर्नाटक बँक भरती उमेदवारांची निवड प्रक्रिया?

कर्नाटक बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ऑफिसर (स्केल – I) या पदाच्या भरती करिता उमेदवारांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम नियुक्तीपत्र वितरित करण्यात येईल. Karnataka Bank Recruitment अंतर्गत उमेदवारांची परीक्षाही फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित करण्यात येईल. उमेदवारांची हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर त्यांना ईमेल द्वारे कळविण्यात येईल.

कर्नाटक बँक भरती अधिकृत जाहिरात येथे चेक करा 

मित्रांनो वरील लिंक वरून कर्नाटक बँक भरतीची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून घ्या. जाहिराती नमूद करण्यात आलेले सर्व शैक्षणिक पात्रता तसेच अटी व शर्ती आणि इतर बाबी विचारात घेऊन नंतरच्या भरती अंतर्गत अर्ज करावा.

 

अर्ज करणाऱ्यांसाठी सूचना:

1. जर तुम्ही या Karnataka Bank Bharti 2023 अंतर्गत अर्ज करणार असाल तर बँकेच्या वतीने जाहीर केलेली भरतीची अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ संपूर्णपणे वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा.

2. पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन पात्र असाल तर अर्ज करावा.

3. उमेदवारांनी स्वतः भरती बद्दलची संपूर्ण माहिती गोळा करावी खात्री झाल्यानंतर अर्ज करावा.

4. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने शेवटच्या तारखेच्या आत सादर करायचा आहे.

5. भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा अधिक माहिती करिता अधिकृत जाहिरात वाचावी.

Leave a Comment