राज्यामध्ये 4 ते 9 मार्च या तारखेच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडला, या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे याआधी सुद्धा गुढीपाडव्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस आलेला होता तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांची पिके हाताला येऊन सुद्धा वाया गेली. त्याचप्रमाणे 4 ते 9 मार्च या तारखेच्या दरम्यान सुद्धा अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्यामुळे अनेक प्रकारच्या पिकांना पावसामुळे फटका बसलेला आहे.
अचानकच आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी बेस सावध होते त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतमाल त्या पावसामध्ये सापडले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे त्यामध्ये विविध प्रकारचे पिके होती त्यांचे नुकसान झाले.
अवकाळी पावसामुळे 14 जिल्ह्यात एवढ्या क्षेत्राचे नुकसान
अवकाळी पावसामुळे एकूण 14 जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे, 14 जिल्ह्यातील एकूण 28 हजार हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके खूप मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली आहे.
या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामध्ये विविध प्रकारची पिके होते त्यात हरभरा, गहू,वाटाणा, झेंडू, कलिंगड, कांदा, आंबा,मक्का, त्याचप्रमाणे ज्वारी,डाळिंब इत्यादी प्रकारची पिके होती व त्या पिकांना अचानक आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,
त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 8 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झालेलेआहे.
त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे अनेक प्रकारच्या पिकांची नुकसान झालेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये एकूण 58009 हेक्टर क्षेत्राची नुकसान झालेले आहे.
त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये एकूण सात हजार पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झालेले आहे.
या 14 जिल्ह्यांमध्ये पावसामुळे झाले नुकसान
1. अवकाळी पावसामुळे 14 जिल्ह्यांना फटका बसलेला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 37 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेली आहे.
2. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 5859 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झालेले आहे.
3. धाराशिव जिल्ह्यामध्ये 20859 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.
4. नाशिक जिल्ह्यामध्ये 8003 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.
5. नगर जिल्ह्यामध्ये 7 हजार 305 हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
6. त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यात 1174 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.
7. बीड जिल्ह्यामध्ये 2762 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान झाले.
8. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये 60 हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
9. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 46 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
10. रायगड जिल्ह्यामध्ये 50 हेक्टर क्षेत्र बाधित आहे.
11. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये 53हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
12. सातारा जिल्ह्यामध्ये 47 हेक्टर क्षेत्रामध्ये पिकांची नुकसान झालेली आहे.
13. पुणे मध्ये 3 हेक्टर क्षेत्र बाधित आहे.
14. धुळे मध्ये 29 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
अशाप्रकारे 4 ते 9 तारखेच्या दरम्यान अवकाळी पाऊस झालेला होता व या अवकाळी पावसामुळे अनेक प्रकारचे शेतीपीकांचे नुकसान झालेले आहे.