जमीन खरेदी विक्रीची व्यवहार करतांना, नवीन जमीन खरेदी करताना हे नवीन नियम लक्षात ठेवा, अथवा नंतर पश्चाताप होईल | New Land Rules 2024

 

शेतकरी बांधवांनो आपण नवीन जमीन खरेदी करत असतो किंवा आपल्याकडे असणारी जमीन विक्री करत असतो. जर तुम्ही एवढ्यात एखाद्या जमिनीचा व्यवहार करणार असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी खालील काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवायचे आहे. जमिनीची खरेदी विक्री करताना खालील महत्वाचे नियम लक्षात ठेवल्यास आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

ज्या ठिकाणी जमीन किंवा पैसा तसेच संपत्ती यांचा प्रश्न येतो अशा वेळेस आपण जपून राहायला पाहिजे. कारण की ज्या वेळेस या तीन बाबींचा प्रश्न येतो त्यावेळेस स्वतःचा भाऊ सुद्धा आपला नसतो. एकंदरीतच सांगायची झाल्यास प्रत्येकाला जमीन, संपत्ती, पैसा हवा आहे. त्यामुळे यासाठी नंतर भांडण तंटे करण्यापेक्षा वेळीच जागरूक होऊन प्रत्येक व्यवहार योग्य पद्धतीने केला तर नंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येत नाही.

 

जमिनीचे व्यवहार करताना काळजी घेणे का आवश्यक आहे?

जमिनीची व्यवहार करताना आपल्याला प्रत्येक बाबीवर योग्य पद्धतीने लक्ष द्यावे लागते, आपण एखाद्या जमिनीची खरेदी केली म्हणजेच ती जमीन आपल्या नावावर केली तर त्यानंतर जेव्हा आपण ती जमीन प्रत्यक्षात असतो त्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे जमिनीची खरेदी करताना सर्व बाबी स्पष्ट करून घ्या.

 

जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करताना खालील बाबी लक्षात ठेवा:

1. जमिनीचा सातबारा पहा:

जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे त्या जमिनीचा सातबारा असतो. त्यामुळे तुम्हाला त्या जमिनीचा सातबारा पाहायचा आहे. सातबारावर एक महत्त्वाची गोष्ट लिहिलेली असते ती म्हणजे भोगवटदार क्रमांक. जमिनीचा भोगवटदार क्रमांक एक असेल तरच ती जमीन तुम्हाला खरेदी करता येते. भोगवटदार क्रमांक एक ची जमीन खरेदी केल्यानंतर तुमच्याकडे शंभर टक्के मालकी प्राप्त होते.

 

2. जमिनीचे खरेदी खत बनवा:

आता तुम्ही जमिनीची खरेदी केल्यानंतर तुम्हाला ते जमिनीचे खरेदी खत बनवायचा आहे. जमिनीचे खरेदीखत तुम्ही दुय्यम निबंध कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करून बनवू शकतात.

3. जमिनीचा पोट खराब चेक करा:

जमीन खरेदी करत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्या जमिनीचा किती हिस्सा हा पोट खराब मध्ये मोडतो हे पाहायचं आहे. जमिनीचा पोट खराब भाग म्हणजे असा भाग असतो ज्यामध्ये आपण शेती करू शकत नाही. त्यामुळे जर त्या जमिनीवर जास्त पोट खराब क्षेत्र असेल तर ती जमीन तुम्ही खरेदी करू नये.

 

4. शेतात जाण्यासाठी रस्ता आहे का ते पहा:

अनेक वेळा एखाद्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन खरेदी केल्यानंतर त्याने जी जमीन खरेदी केलेली आहे त्या जमिनीच्या शेजारच्या शेतकऱ्यासोबत रस्त्यासाठी भांडण होताना दिसते. त्यामुळे जमिनीची खरेदी करताना शेतामध्ये रस्ता आहे का याची खात्री करून घ्या.

5. तुम्ही खरेदी विकत घेत असणारी जमीन आरक्षित आहे का ते चेक करा:

अनेक वेळा शासनाच्या माध्यमातून जमीन घोषित म्हणजेच आरक्षित करण्यात येईल. शासनाच्या माध्यमातून जमिनीचा हिरवा पट्टा तसेच पिवळा पट्टा म्हणून आरक्षित करण्यात येत असते. त्यामुळे अशी आरक्षित असणारी जमीन शक्यतो आपण खरेदी करू नये.

6. जमिनीवर बोजा आहे का तपासा:

अनेक वेळा शेतकरी शेती उपयोगी खर्चासाठी किंवा इतर कामांसाठी जमिनीवर कर्ज काढत असते त्यामुळे त्या कर्जाची रक्कम बोजा म्हणून सातबारावर चढवण्यात येत असते. त्यामुळे तुम्ही जी जमीन खरेदी करत आहात म्हणजेच विकत घेत आहात त्या जमिनीवर बोजा आहे का ते चेक करा आणि असेल तर ते सर्व कर्ज नील करून नंतर जमीन खरेदी करा.

अशाप्रकारे वरील सर्व बाबी शेतकऱ्यांना नवीन जमीन खरेदी करताना तसेच जमिनीचे खरेदी विक्रीची व्यवहार करताना लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Leave a Comment