Gharkul Yadi 2024: घरकुल योजनेची नवीन यादी प्रसिद्ध, अशाप्रकारे पहा तुमच्या गावाची नवीन यादी

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाचा स्वतःचा हक्काचे घर असण्याच स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. 2024 पर्यंत देशातील प्रत्येक बेघर कुटुंबांना घरकुल देण्यात येणार असून त्याकरिता केंद्र शासन कटीबद्ध आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अनुदान देण्यात येते. योजनेची काही गावांची नवीन यादी आलेली असून ही यादी आपण आपल्या मोबाईल मध्ये कसे पाहायचे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून जाणार आहोत.

घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर:

केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र ठरलेला नवीन लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल तर या यादीमध्ये आपले नाव आले का ते चेक करू शकतात. यादीमध्ये नाव पाण्याची संपूर्ण प्रोसेस खालील दिलेली आहे.

 

घरकुल यादी ऑनलाईन कशी पहायची? Gharkul Yojana List:

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची जर तुम्हाला नवीन घरकुल यादी पाहिजे असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये पीएम आवास योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
2. आता वेबसाईटवर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये रिपोर्ट नावाच्या पर्यावर क्लिक करा.
3. घरकुल योजनेची यादी पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन थेट यादी पाहता येते.
4. आता या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या राज्य निवडायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा तसेच आपला तालुका त्यानंतर आपलं गाव आणि खाली दिलेल्या त्याच्या कोड टाकायचा आहे.
5. आता तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत यादी पाहिजे त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना निवडायचा आहे.
6. त्यानंतर या वर्षाची यादी पाहिजे ते चालू वर्ष सिलेक्ट करा आणि शेवटी ओके केल्यानंतर तुमच्यासमोर त्या गावाची यादी दिसेल.

घरकुल योजनेची आपल्या गावाची नवीन यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

वर दिलेली लिंक ही घरकुल योजनेची यादी पाहण्याची थेट लिंक असून तुम्ही केली ओपन करा, वर सांगितल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर तुमच्यासमोर यादी ओपन होईल ती आधी तुम्ही डाऊनलोड करू शकतात किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात.

घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळाले नाही तर तक्रार कशी करायची या संदर्भात संपूर्ण माहिती येथे पहा

टीप: राज्यातील काही गावांची नवीन यादी आलेली असून योजनेचा dashboard मध्ये अनेक गावांच्या याद्या अजून अपलोड झालेल्या नाहीत त्यामुळे गावातील घरकुल मंजूर झाल्यानंतर त्या याद्या या वेबसाईटवर अपलोड होतील.

Leave a Comment