Talathi Bharti: तलाठी भरती हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध, या पद्धतीने करा डाऊनलोड

महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षा घेतली जाणार आहे, तसेच भरतीमध्ये एकूण भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या 4344 एवढी आहे, एवढ्या भरल्या जाणाऱ्या तलाठी भरतीच्या जागांसाठी खूप जास्त प्रमाणात अर्ज केले गेलेले आहे, परीक्षा द्वारा उमेदवाराची निवड केली जाणार आहे. तसेच राज्यामध्ये एकूण 36 जिल्ह्यांमधील केंद्रावर तलाठी भरती गट-क ची परीक्षा घेण्यात येणार आहे. व या परीक्षेचे हॉल तिकीट कशा पद्धतीने काढायचे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.

तलाठी भरतीची परीक्षा एकूण 19 दिवसांमध्ये होणार आहे, व संबंधित तारखा सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे. परीक्षेचे स्वरूप ठरवण्यात आलेले असून प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहे, मराठी, अंकगणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी या विषयांसाठी प्रत्येकी 50 गुणांची म्हणजेच एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.

Marathi hi tech

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे, मुख्य बाब म्हणजे निवड प्रक्रियेमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवाराला 45 टक्के एवढे गुण प्राप्त असायला हवे. एकूण सत्रांची वेळ सुद्धा ठरवण्यात आलेली आहे, एका दिवसांमध्ये 3 सत्र परीक्षेचे होणार आहे. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या तारखे दरम्यान म्हणजेच १९ दिवस, परीक्षा होणार आहे.

तलाठी भरतीच्या परीक्षेचे हॉल तिकीट परीक्षेपूर्वी तीन दिवस आधी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसेच परीक्षा 17 ऑगस्ट पासून चालू होत असल्यामुळे, तलाठी भरती चे तिकीट वेबसाईटवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे, तसेच यासंबंधीची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर, ईमेल आयडी वर पाठवण्यात येईल.

उमेदवारांना प्रश्न पडलेला असेल नक्की हॉल तिकीट कोणत्या वेबसाईट वरून डाऊनलोड करायचे आहे तर परीक्षेच्या तीन दिवस आधी अधिकृत वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत असल्याने उमेदवारांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी http://mahabhumi.gov.in वेबसाईट दिलेली आहे त्यावरून उमेदवार वेबसाईटला भेट देऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहेत.

हॉल तिकीट ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment