देशांमध्ये अशा अनेक प्रकारच्या योजना आहे की ज्या योजनांमध्ये नागरिक पैसा गुंतवतात व तो पैसा वृद्धाप काळामध्ये शांततेने जीवन जगण्यासाठी उपलब्ध होईल या कारणाने नागरिकांचा कल पैशाची गुंतवणूक करणे याकडे वाढलेला आहे, व अशा प्रकारचीच एक एलआयसीची योजना आहे त्या योजनेचे नाव एलआयसी नवीन जीवन शांती योजना असे आहे, योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळामध्ये पेन्शनच्या पैशांमध्ये आनंदाने जीवन जगण्यास मदत होते. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की या योजनेचा व्याजदर आहे तरी किती? किती रुपये गुंतवावे लागतात?
एलआयसीच्या नवीन जीवन शांती योजनेमध्ये, साधारणतः5.50 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना दरवर्षी तब्बल 50000 रुपयांची पेन्शन देण्यात येते, व त्यामुळे ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी आहे, एलआयसीच्या या नवीन जीवन शांती योजनेचा प्लॅन 858 एवढा आहे. तसेच योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे योजनेमध्ये एकदाच पैसे जमा करावे. व गुंतवणूकदाराला योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर आयुष्यभर पेंन्शन दिली जाते.
एलआयसी ची नवीन जीवन शांती योजना आहे, एक सिंगल प्रीमियम योजना असून, यामध्ये एकल जीवन तसेच संयुक्त जीवन या दोन्हींमध्ये सुद्धा पेन्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे, तसेच योजनेअंतर्गत 30 ते 79 वर्षे वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकणार आहे. त्यामुळे या वयोगटातील असणाऱ्या व्यक्तीने एलआयसीच्या नवीन जीवन शांती योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास वृद्धापकानातील असलेली चिंता दूर होणार आहे.
योजनेची मुख्य बाब म्हणजे योजनेमधून व्यक्ती कधीही सरेंडर कृत शकणार आहे, कारण योजनेमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तसेच मृत्यू झाल्यास खात्यात रक्कम जमा केली जाते व, योजनेचे प्लॅन खरेदी करत असताना काही कारणास्तव नोकरीमध्ये मुदतपूर्व निवृत्ती घ्यावी लागते, त्यामुळेच ही योजना राबविण्यात आलेली आहे. तुम्हाला पेन्शनची निश्चित रक्कम सुद्धा निर्धारित करता येते तसेच दरमहा पेन्शन एका वर्षाच्या नियमित अंतरानंतर दिली जाते. तसेच योजनेमध्ये साधारणतः6.81 ते 14.62% व्याजदर आहे.
टीप: आम्ही कुणालाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. ही माहिती lic च्या पोर्टल वर घेण्यात आलेली आहे.