Job Alert: अंगणवाडी मदतनीस भरती, 12 वी उत्तीर्ण महिलांनो आत्ताच अर्ज करा

बारावी पास असणाऱ्या महिलांसाठी उत्तम नोकरीची संधी चालून आलेली आहे. अंगणवाडी मदतनीस ची भरती केली जाणार आहे. व ही एक महिलांसाठी उत्तम नोकरीची संधी ठरेल. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या महिला अर्ज करू शकणार आहेत. त्याचबरोबर भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये काही शहरात ही भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी भरतीची जाहिरात वाचावी. त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा, अर्जाची पद्धत याविषयी संपूर्ण माहिती पोस्टमध्ये दिलेली आहे.

अंगणवाडी मदतनीस भरती

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस

भरली जाणारी पदे – 17

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे

या शहरात भरती

1 वाशिम
2 मंगरूळपीर
3 मानोरा
4 कारंजा
5 पातुर
6 बार्शी टाकळी     
 7    बाळापुर
8 अकोट

 

अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची दिनांक- 14 जुलै 2023

पगार – 5,500 रुपये प्रति महिना

1 शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करण्यासाठी 12 वी पास असलेल्या महिला पात्र असणार आहे.
  • महिलांनी जर बारावीनंतर शिक्षण घेतलेले असेल तरीही महिला अर्ज करू शकतात.
  • बारावी पास असणे आवश्यक आहे, बारावी पास नसणाऱ्या महिलांनी अर्ज करू नये.
  • महिलेला मराठी भाषेचे ज्ञान असायला हवे

भरतीची जाहिरात व अर्जाचा नमुना बघण्यासाठी येथे क्लिक करा

 शहरानुसार पदाचा तपशील

 

क्र शहर पदे
1 वाशिम 1
2 मंगरूळपीर 4
3 मानोरा 1
4 कारंजा 1
5 पातुर 4
6 बार्शी टाकळी 4
7 बाळापुर 1
8 अकोट 1

 अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर अर्ज करताना कोणत्याही प्रकारची खोड तोड करू नये, किंवा चुकी आढळल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, व यासाठी उमेदवार सर्वस्वी जबाबदार राहतील. उमेदवारांनी अर्ज करताना संपूर्ण माहिती खरी भरावी त्याचप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडून जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना प्रिंट काढून त्यावर अर्ज भरून तो अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर नेऊन द्यावा किंवा पोस्टाद्वारे पाठवावा. त्याचप्रमाणे शेवटच्या दिनांक च्या आत अर्ज सादर करावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.

अटी व शर्ती 

  •  फक्त महिलाच अर्ज करू शकणार आहे.
  •  ऑफलाइन पद्धतीने भरले गेलेले अर्ज स्वीकारण्यात येईल.
  •  उमेदवार बारावी शिकलेला असावा.
  •  अर्ज योग्य व खऱ्या पद्धतीने भरावा, अर्जामध्ये खोडताड केल्यास किंवा चुकी आढळल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

भरतीची जाहिरात व अर्जाचा नमुना बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment