PM Kisan Sanman Nidhi Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत अशा पद्धतीने अर्ज करा व लाभ मिळवा 

केंद्र सरकार द्वारा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी वितरित केल्या जातो. त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारे पैसे टप्प्याटप्प्याने देण्यात येते. वर्षातून तीन टप्पे पाडले जाते. त्यातील एका टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. असे वार्षिक तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतात म्हणजेच एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात.

देशातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत आहे त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत मिळण्यात आलेल्या निधीमुळे शेतकऱ्यांना खूप जास्त प्रमाणात फायदा होत आहे त्याचप्रमाणे आर्थिक मदत सुद्धा शेतकऱ्यांना होत आहे त्यामुळे शेतकरी वर्षाला सहा हजार रुपयाचा लाभ घेतात.

परंतु काही शेतकरी अडचणींमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेऊ शकत नाही त्यांनी अनेक वेळा अर्जही केला आहे परंतु त्यांना मान्यता मिळालेली नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र ठरण्याकरिता वाट पहावी लागते, त्यामुळे तहसीलदार कार्यालयामार्फत अर्ज करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरल्यानंतर मान्यता मिळणे आवश्यक आहे.

मोबाईल वरून जर अर्ज केलेला असेल तर अर्जाची तपासणी केल्या जाते तलाठी कार्यालयामार्फत कर्जाची तपासणी केल्या जाते त्याचप्रमाणे तपासणी झाल्यानंतर तुमचा अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येतो, अर्ज वरिष्ठ कार्यालयामध्ये पाठवण्यात येते त्यामुळे सर्वप्रथम अर्ज भरणे आवश्यक आहे.

 

 या शेतकऱ्यांना मिळत आहे लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अनेक शेतकरी लाभ घेत आहे, या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2019 च्या आधी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल तर त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत लाभ मिळवता येतो. Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.

 

Required Document:किसान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत कागदपत्रे,पात्रता

 

शेतकरी सन्मान योजना अंतर्गत ला मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड

बँक पासबुक

रेशन कार्ड

सातबारा

आठ अ

वरील सर्व कागदपत्रे तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्याकडे नेऊन द्यावी त्यानंतर तुमच्या फॉर्मची नोंदणी केली जाते व मंजुरी मिळाली तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत घेता येतो.

Pradhanmantri शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता काही पात्रता आवश्यक आहे, शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची जमीन एक फेब्रुवारी 2019 पूर्वी शेतकऱ्यांच्या नावावर असावी. जर एक फेब्रुवारी 2019 च्या नंतर जमीन नावावर असेल तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही.

या शेतकऱ्यांना मिळणार एका एकराला 75 हजार रुपये, सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात करता सरकार घेणार भाड्याने शेत 

 

 

पी एम किसान योजना अंतर्गत लाभ मिळवण्याकरिता योग्य पद्धतीने अशा प्रकारे अर्ज भरा

 

1.एम किसान योजनेअंतर्गत अर्ज भरण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागले.

2.त्यानंतर new former registration यावर क्लिक करा

3.त्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची माहिती टाकायची आहे, त्यानंतर तुम्हाला तुमची राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे सर्व निवडायचे आहे.

4.त्यानंतर तुमच्या बँक क्रमांकाचा आय एफ एस सी कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागली.

5.त्यानंतर सबमिट फॉर्म आधार एप्लीकेशन या ऑप्शन वर क्लिक करा.

6.त्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा निवडायचा आहे, तुमच्या शेताचा गट नंबर टाकून तुमच्या नावावर किती जमीन आहे ते टाका, व ऍड या ऑप्शन वर क्लिक करा

7.त्याचप्रमाणे वरील सर्व कागदपत्रे दाखवलेली आहे ती कागदपत्रे अपलोड करावी.

8.त्यानंतर संपूर्ण save करा

9.त्यानंतर संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही अर्जाची प्रिंट काढू शकता.

अशाप्रकारे तुमचा संपूर्ण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अचूक पद्धतीने अर्ज पूर्ण होईल व तुम्ही योजनेचा लाभ मिळू शकणार.

बांधकाम कामगार, आत्ताच मिळवा 32 योजनांचा लाभ, ऑनलाइन पद्धतीने करा नोंदणी

 

Leave a Comment