फेरफार उताऱ्याची अनेक ठिकाणी काम पडतात, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना फेरफार काढायचा असेल त्यांना आता कुठे जाण्याची गरज नाही कारण ते स्वतः फेरफार उतारा काढू शकतात. फेरफार नमुन्यामध्ये जमीन संबंधीची संपूर्ण माहिती असते त्याप्रमाणे जमिनीवर किती बोजा आहे, जमिनीची खरेदी विक्री या संबंधीची संपूर्ण माहिती दिलेली फेरफार उताऱ्यामध्ये असते.
अशाप्रकारे अनेक कारणांनी फेरफार उतारा काढण्याची गरज भासते, त्यामुळे फेरफार उतारा काढावा लागतो, परंतु आता घरबसल्या मोबाईल वरून सुद्धा सातबारा उतारा डाऊनलोड करता येतो. यामुळे कुठेही जाण्याची गरज भासत नाही त्याचप्रमाणे घरबसल्या सातबारा उतारा डाऊनलोड करता येतो.
अशा प्रकारे फेरफार उतारा मोबाईल वरून डाउनलोड करा.
1.सातबारा उतारा काढण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला एका वेबसाईटवर जावे लागेल,digitalsatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम सातबारा नावाचं एक पेज ओपन होईल,
2.जर तुम्ही आधी च वेबसाईटवर जाऊन नोंदणी केलेली असेल तर त्याचा आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही सातबारा उतारा काढू शकता. त्याचप्रमाणे मोबाईल क्रमांक टाकून सुद्धा इतर सेवांचा लाभ घेता येतो.
3. मोबाईल नंबर टाकून सेंट ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो ओटीपी तिथे नावाचा ऑप्शन दिसेल त्यामध्ये मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
4. त्यानंतर सातबारा नावाचे एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर डिजिटल सिग्नेड ई फेरफार या पर्यायावर क्लिक करा.
5. त्यानंतर तुमचा फेरफार उतारा काढण्यासाठी पंधरा रुपये तुमच्या बॅलन्स मधून कापले जाते.
6. त्यानंतर पेमेंट साठी ची संपूर्ण माहिती भरावी लागेल, संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला submit बटनावर क्लिक करायचे आहे.
7. त्यानंतर तुमचे पेमेंट सक्सेस झालेले आहे असा मेसेज आल्यानंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा.
8. त्यानंतर डिजिटल पार्क या पर्यायावर क्लिक करा.
9. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याचप्रमाणे जिल्हा निवडल्यानंतर तालुका,गाव निवडायचे आहे, फेरफार क्रमांक टाकायचा आहे.
10. त्यानंतर शेवटी download पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही पंधरा रुपये पेमेंट केलेली आहे असे दिसेल,त्यानंतर Ok बटनावर क्लिक करा.
11. त्यानंतर तुमच्या पेजवर तुमचा डिजिटल स्वाक्षरी असलेला फेरफार होईल.
अशाप्रकारे ऑनलाईन मोबाईल वरून फेरफार काढता येतो,त्यामुळे त्यांना तुम्हाला फेरफार हवा असेल तर तुम्ही वरील सर्व स्टेप वरून फेरफार उतारा मोबाईल वरून काढू शकता.