सोलापूर महानगरपालिकेत उप-परिवहन व्यवस्थापक पदाकरिता भरती सुरू | Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत उप परिवहन व्यवस्थापक या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या सोलापूर महानगरपालिका भरती अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या Solapur Mahanagarpalika Recruitment अंतर्गत पदांचा तपशील तसेच भरतीची अधिकृत जाहिरात, अटी व शर्ती तसेच पात्रता या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने काही पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. Solapur Mahanagarpalika Bharti ही कंत्राटी तत्वावर राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ठराविक कालावधी करिता त्या पदावर राहता येईल. सोलापूर महानगरपालिकेची ही भरती तात्पुरत्या स्वरूपात असून या भरती अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ठरवून दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

 

सोलापूर महानगरपालिका भरती तपशील:

पदांचे नाव: उप परिवहन व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:

1. पदवीधर

2. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये पदवी

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 जानेवारी 2023

अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन

अर्ज फी: 500 रू

अनुभव: संबंधित पदाचा दहा वर्षाचा अनुभव

नोकरी ठिकाण: सोलापूर जिल्हा

वेतन: या भरती अंतर्गत मिळणारे वेतन उमेदवारांना मुलाखतीच्या दिवशी कळविण्यात येईल.

नोटिफिकेशन जाहीर झाल्याचा दिनांक: 30 डिसेंबर 2022

उत्तर पश्चिम रेल्वेत 2026 जागांकरिता अप्रेंटिस भरती सुरू

सोलापूर महानगरपालिका भरती अर्ज कसा व कुठे करायचा? How and where to apply for Solapur Municipal Corporation Recruitment?

Solapur Municipal Corporation Recruitment अंतर्गत उमेदवारांना अर्ज हा विहित नमुन्यातील ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचा आहे. उमेदवारांनी अर्जासोबत त्यांची सर्व शैक्षणिक तसेच वैयक्तिक पात्रतेची तसेच अनुभव प्रमाणपत्र सादर करायची आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्जासोबतच पाचशे रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. डिमांड ड्राफ्ट जोडलेल्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने खालील ऍड्रेस वर करा.

 

अर्ज पत्ता:

सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे प्रशासकीय कार्यालय जुना एम्प्लॉयमेंट चौक तिसरा मजला सोलापूर

वरील पत्त्यावर उमेदवारांना अर्ज तसेच डिमांड ड्राफ्ट पाठवायचा आहे.

 

सोलापूर महानगरपालिका भरती अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया Solapur municipal corporation recruitment selection process:-

Solapur municipal corporation recruitment अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे होणार आहे. ज्या उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर केलेले आहेत त्यांना पत्राद्वारे मुलाखतीची वेळ कळविण्यात येईल. ठरवून दिलेल्या तारखेवर मुलाखतीस हजार असलेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार त्यांची निवड करण्यात येईल.

 

सोलापूर महानगरपालिका उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख व पत्ता: –

मित्रांनो या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे होणार असल्यामुळे या भरती अंतर्गत उमेदवारांची मुलाखत कोणत्या तारखेला व कोणत्या पत्त्यावर होणार आहे याची माहिती आपल्याला असली पाहिजे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उप परिवहन व्यवस्थापक या पदाच्या भरती करिता उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख उमेदवारांना पत्राच्या माध्यमातून कळविण्यात येणार आहे त्याचबरोबर मुलाखतीचा पत्ता सुद्धा त्याच पत्रावर कळविण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांना केवळ अर्ज करायचा आहे, पुढील प्रक्रिया महापालिकेद्वारे कळविण्यात येईल.

notification चेक करा- 

 

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना:

1. जे उमेदवार या भरती अंतर्गत अर्ज सोबत पाचशे रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवतील त्यांचेच अर्ज स्वीकारण्यात येतील.

2. उमेदवारांना 9 जानेवारी 2023 पूर्वी वर दर्शविलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत. उशिरा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

3. या भरती अंतर्गत उमेदवारांची मुलाखत होणार असून मुलाखतीची तारीख ही उमेदवारांना त्यांनी अर्जावर दिलेल्या पत्त्यावर पत्राच्या माध्यमातून कळविण्यात येईल.

4. उमेदवारांची अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे होणार असल्यामुळे उमेदवारांना मुलाखतीस हजर राहणे बंधनकारक आहे.

5. या भारतीय अंतर्गत मानधनाबाबत सध्या कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नसून वेतन किती मिळेल, हे उमेदवारांना मुलाखतीच्या दिवशी कळणार आहे.

6. ही भरती प्रक्रिया केवळ 6 महिन्यांकरिताच कंत्राटी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

7. ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.

वनरक्षक भरती पात्रता; वनरक्षक भरती शैक्षणिक, शारीरिक पात्रता

सोलापूर महानगरपालिका भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट करून प्रश्न विचारा. तुम्हाला असलेल्या प्रश्नांची आम्ही नक्कीच उत्तर देऊ. ही माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या जॉब अपडेट विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment