मित्रांनो आपल्या भारत देशात राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत असून या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांकरिता वेळोवेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असते. राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. NHM Bharti Kolhapur अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या काही रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची केवळ मुलाखत घेण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता आपण ही नोकरी मिळवू शकतो.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर भरती अंतर्गत येणाऱ्या विविध पदांची भरतीची अधिकृत नोटिफिकेशन ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. या NHM Recruitment Kolhapur 2023 अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला इंटरव्यू करिता हजर राहायचे आहे. उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहताना त्यांच्याकडील सर्व शैक्षणिक तसेच वैयक्तिक पात्रतेची व अनुभव प्रमाणपत्रे घेऊन हजर राहायचे आहे.
मित्रांनो NHM Kolhapur Bharti 2023 अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भारतीय अंतर्गत प्रकाशित केलेली अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचून घ्यावी नोटिफिकेशन आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून देत आहोत.
NHM Kolhapur recruitment details :-
एकूण जागा: 19
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
वेतन: 60 हजार रुपये प्रति महिना
शैक्षणिक पात्रता:
1. भारतीय अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एम.बी.बी.एस. ही शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी.
2. तसेच उमेदवारांची एम. एम. सी. ची. नोंदणी पूर्ण झालेली असावी.
अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारे
भरतीची अधिकृत वेबसाईट– ही आहे
एन एच एम भरती कोल्हापूर निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया How to apply for nhm bharti kolhapur:-
मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती कोल्हापूर अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला या भरती अंतर्गत थेट मुलाखत द्यायची आहे. या NHM Kolhapur Bharti 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे होणार असून दिलेल्या वेळेवर दिलेल्या तारखेला तसेच दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी थेट मुलाखत देऊन त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. उमेदवारांची निवड ही त्यांनी धारण केलेली शैक्षणिक अहर्ता अनुभव प्रमाणपत्रे तसेच मुलाखत यांच्या आधारे होणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती कोल्हापूर अंतर्गत मुलाखत कधी आणि कुठे होणार?
मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती कोल्हापूर अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे होणार असल्यामुळे उमेदवारांना मुलाखती करीत हजर राहायचे आहे. या भरती अंतर्गत दर आठवड्याला सोमवार या दिवशी 11 वाजता मुलाखत आयोजित करण्यात येणार आहे. तुम्हाला आता मुलाखतीची वेळ कळाली आहे, आता मुलाखतीचा पत्ता खालील प्रमाणे आहे.
मुलाखतीचा ऍड्रेस:
राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, दुसरा मजला नागाळा पार्क, कोल्हापूर.
मित्रांनो वरील पत्त्यावर दर सोमवारी मुलाखत आयोजित करण्यात येणार असून तुम्ही या nhm Kolhapur bharti 2023 अंतर्गत पात्र असाल तर सोमवार या दिवशी मुलाखतीस हजर राहून तुमची निवड निश्चित करून घ्यावी. या भरती अंतर्गत मुलाखत ही संपूर्ण रिक्त जागा पूर्ण भरेपर्यंत सोमवारी होणार आहे. भरती अंतर्गत संपूर्ण रिक्त पदे भरल्यानंतर मुलाखत बंद करण्यात येणार आहे.
औरंगाबाद महानगरपालिका भरती 2023
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना:
1. या NHM Kolhapur Bharti अंतर्गत उमेदवारांना सोमवार या दिवशी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे.
2. भरती अंतर्गत मुलाखत ही रिक्त जागा भरेपर्यंतच आयोजित करण्यात आलेली आहे. रिक्त जागा भरल्यानंतर भरती प्रक्रिया थांबवण्यात येईल.
3. उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी त्यांची सर्व शैक्षणिक तसेच पात्रतेची सर्व कागदपत्रे ही सोबत घेऊन जायचे आहे.
4. या भरती अंतर्गत उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखतीच्या आधारे होणार असून जे उमेदवार मुलाखती अंतर्गत पात्र ठरविण्यात येईल, त्यांचीच अंतिम निवड करण्यात येईल.
5. या रिक्रुटमेंट अंतर्गत पदसंख्येत बदल करणे तसेच भरतीच्या तारखा ठरविणे व मुलाखतीची वेळ व इतर सर्व अधिकार हे संस्थेकडे राखून ठेवण्यात आली आहे.
एन एच एम भरती अधिकृत नोटिफिकेशन:
एन एच एम भरती अंतर्गत अधिकृत नोटिफिकेशन हे जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. या nhm bharti ची अधिकृत नोटिफिकेशन आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून देत आहोत. खाली दिलेल्या लिंक करून ती नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्या. नोटिफिकेशन मधील सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता यांची माहिती वाचून नंतरच मुलाखतीस हजर राहा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रिक्रुटमेंट कोल्हापूर संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.