महापारेषण चंद्रपूर भरती 2023; दहावी पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज | Mahapareshan Chandrapur Bharti 2023

मित्रांनो महापारेषण चंद्रपूर यांच्यामार्फत काही पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महापारेषण चंद्रपूर भरती अंतर्गत दहावी पास झालेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोकरी मिळू इच्छिणाऱ्या दहावी पास असलेल्या तरुणांकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित चंद्रपूर मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे. महापारेषण भरती चंद्रपूर संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित चंद्रपूर यांच्यावतीने वीजतंत्री या पदांच्या काही रिक्त जागांकरिता भरतीची अधिकृत जाहिरात करण्यात आलेली आहे. या महापारेषण भरती चंद्रपूर अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून ही Mahapareshan Chandrapur Bharti 2023 एकूण 30 जागांकरिता राबविण्यात येत आहे. जर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि दहावी पास असाल तर तुम्ही या भरती अंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहात.

 

Mahapareshan Company Limited Chandrapur is conducting the recruitment process for the posts of Electrician. Interested and eligible candidates under this Mahapareshan recruitment have to apply online within the last date. Complete details regarding Mahapareshan Recruitment 2023 are given below.

 

महापारेषण भरती चंद्रपूर तपशील Mahapareshan Recruitment Chandrapur Details:

एकूण जागा: 30

पदांची नाव: वीजतंत्री

वयोमर्यादा: 18 ते 33 वर्ष

अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन

वेतन: शासनाच्या नियमानुसार विद्यावेतन लागू

शैक्षणिक पात्रता:

1. दहावी उत्तीर्ण

2. वीजतंत्री या विषयात आयटीआय उत्तीर्ण

अनुभव: आवश्यकता नाही

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालय भरती भंडारा 2023; विविध रिक्त जागांकरिता अर्ज सुरू

महापारेषण भरती चंद्रपूर अर्ज कसा आणि कुठे करायचा?How and where to apply for Mahapareshan Recruitment Chandrapur?

महापारेषण भरती चंद्रपूर अंतर्गत सुरुवातीला उमेदवारांना अर्ज हा अप्रेंटिस इंडिया च्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी तसेच अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आणि महापारेषण चंद्रपूर यांच्यावतीने ठरवून देण्यात आलेल्या ऑफलाइन पत्त्यावर जमा करायचा आहे. Mahapareshan Bharti चंद्रपूर 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज वेबसाईट-

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी वरील लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. आणि त्यानंतर खाली दिलेल्या पत्त्यावर त्यांचा अर्ज आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे व इतर दस्तऐवज जमा करायचे आहे.

 

अर्ज ऑफलाईन पाठवण्याचा पत्ता:

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, निर्माण भवन मागे, ऊर्जा नगर, चंद्रपूर-442 404

या पत्त्यावर उमेदवारांना त्यांचा ऑनलाइन भरलेला अर्ज सर्व दस्तऐवज जमा करायची आहे.

 

महापारेषण चंद्रपूर भरती अंतर्गत आवश्यक कागदपत्रे Required Documents for Mahapareshan Chandrapur Bharti :-

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित चंद्रपूर यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या Mahapareshan Recruitment अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. हे कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जमा करावी लागतात.

1. दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र

2. दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका

3. आयटीआय उत्तीर्णचे गुणपत्रिका

4. आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र

5. जात प्रमाणपत्र

6. आधार कार्ड

7. सोडल्याचा दाखला

वरील कागदपत्रे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करायची आहे. त्याच प्रमाणे या भरती अंतर्गत ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. त्यावेळेस सुद्धा ही कागदपत्रे जमा करावी लागतात.

गेल इंडिया लिमिटेड भरती 2023

महापारेषण चंद्रपूर भरती महत्त्वाच्या तारखा:

1. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याचा दिनांक- 7 जानेवारी 2023

2. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 14 जानेवारी 2023

3. ऑनलाइन कागदपत्र अपलोड करण्याची अंतिम तारीख- 14 जानेवारी 2023

4. ऑफलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख- 25 जानेवारी 2023

वरील दिलेल्या महत्त्वाच्या तारखा प्रमाणे तुम्हाला या भरती अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने वरील पत्त्यावर अर्ज सादर करावायाचा आहे.

 

मूळ जाहिरात pdf:-

Chandrapur Mahapareshan Bharti 2023 अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यावी, त्या जाहिरातीमधील असलेल्या संपूर्ण अटी व शर्ती तसेच पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता यांची माहिती वाचून नंतरच अर्ज करावा. Mahapareshan Chandrapur Bharti

जाहिरात येथे करा

 

महापारेषण भरती उमेदवारांची निवड प्रक्रिया Selection Process of Mahapareshan Recruitment Candidates:-

Mahapareshan Bharti Chandrapur अंतर्गत उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीच्या परीक्षेमध्ये असणारी टक्केवारी तसेच आयटीआय मध्ये असणारी टक्केवारी या गोष्टी विचारात घेऊन त्यानुसार उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार करून त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण लागू असणाऱ्या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण निहाय सुद्धा निवडण्यात येईल. आरक्षण असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या जातीचा दाखला सबमिट करणे आवश्यक आहे.

 

अर्ज करणाऱ्यांकरिता सूचना:

1. या Mahapareshan Recruitment 2023 अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज सादर करून अर्ज केल्याची ऑनलाइन प्रिंट तसेच इतर सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती व सर्व इतर कागदपत्रे ही ऑफलाइन पद्धतीने जमा करायची आहे.

2. भरतीच्या व्यवस्थापन समितीकडे भरतीच्या पदसंख्येमध्ये बदल करण्याची तसेच भरती संबंधित सर्व अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहे.

3. ही भरती शिकाऊ उमेदवार या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

4. उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज जमा करताना सर्व कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

5. उमेदवारांची निवड ही तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे.

Leave a Comment