वनरक्षक भरती पात्रता; वनरक्षक भरती शैक्षणिक, शारीरिक पात्रता | Vanrakshak Bharti Eligibility

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध पदांसाठी विविध विभागाच्या वतीने मेगा भरती राबविण्यात येत आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये वनरक्षक भरतीचा सुद्धा समावेश असून लवकरच Vanrakshak Bharti Recruitment सुद्धा निघणार आहे. वनरक्षक भरती महाराष्ट्र अंतर्गत आपण पात्र ठरतो का? हे आपल्याला माहीत असले पाहिजे. त्याकरिता आपल्याला Vanrakshak Bharti Eligibility माहित असणे आवश्यक आहे. मित्रांनो वनरक्षक भरतीची शैक्षणिक पात्रता तसेच शारीरिक पात्रता व वयोमर्यादा हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. 

जर आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या वतीने राबविण्यात येणारी वनरक्षक भरती परीक्षा द्यायची असेल तर त्याकरिता आपण पात्र आहोत का याची माहिती करून घ्यावी नंतरच्या दृष्टीने आपला अभ्यास सुरू करावा. कारण की मित्रांनो वनरक्षक भरती अंतर्गत उमेदवारांची शारीरिक पात्रता सुद्धा असायला पाहिजे त्यामुळे आपण कितीही अभ्यास केला आणि शारीरिक दृष्ट्या पात्र नसलो किंवा शैक्षणिक दृष्ट्या पात्र नसलो तर आपण या पदावर जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण आजच्या या पोस्टमध्ये वनरक्षक भरतीच्या संपूर्ण पात्रता बद्दल जसे की वनरक्षक भरतीची शैक्षणिक पात्रता व शारीरिक पात्रता तसेच Vanrakshak Bharti Eligibility Criteria जाणून घेणार आहोत.

वनरक्षक भरती 2023 महाराष्ट्र अंतर्गत उमेदवारांकडे तीन प्रकारच्या पात्रता असणे आवश्यक आहे. त्यातील पहिली पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता तर दुसरी पात्रता म्हणजे शारीरिक पात्रता व तिसरी पात्रता म्हणजे वयोमर्यादा होय. जर आपण Vanrakshak Bharti Maharashtra अंतर्गत या तीनही पात्रता पूर्ण करणारा असाल तर या वनविभाग भरती महाराष्ट्राचा वनरक्षक भरती चा अर्ज आपण भरू शकतो.

 

वनरक्षक भरती शैक्षणिक पात्रता vanrakshak education qualification:

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वनविभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या Vanrakshak Bharti 2023 भरतीची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

1. या भरती अंतर्गत आपण भूगोल किंवा अर्थशास्त्र किंवा गणित किंवा विज्ञान या विषयांमधून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी(10+2) HSC ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी लागते.

2. जर उमेदवार हा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल तर त्याच्याकरिता शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी पास (10) म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

3. त्याचप्रमाणे जर उमेदवार हा माजी सैनिक असेल तर त्यांच्याकरिता सुद्धा शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी पास आहे.

4. त्याचबरोबर उमेदवार हा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीर झालेल्या कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी म्हणजेच पाल्य असेल तर त्याच्याकरिता सुद्धा किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी पास आहे.

मित्रांनो अशा प्रकारे वनरक्षक भरती महाराष्ट्र अंतर्गत उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता असावी लागते. ही झाली शैक्षणिक दृष्ट्या पात्रता आता शारीरिक दृष्ट्या Vanrakshak Bharti recruitment Maharashtra भरतीची पात्रता आपण जाणून घेऊया.

 

वनरक्षक भरती शारीरिक पात्रता vanrakshak bharti maharashtra eligibility criteria 

वनरक्षक भरती 2023 महाराष्ट्र अंतर्गत उमेदवारांकडे खालील प्रमाणे शारीरिक पात्रता असायला पाहिजे.

पुरुष उमेदवारांकरिता शारीरिक पात्रता:

किमान उंची १६३ (से.मी)
छातीचा घेर न फुगवता ७९ (से.मी)
छातीचा घेर फुगवून ८४ (से.मी)


अनुसूचित जमाती मधील पुरुष उमेदवारांकरिता शारीरिक पात्रता:

किमान उंची १५२.५ (से.मी.)
छातीचा घेर न फुगवता ७९ (से.मी.)
फुगवून ८४ (से.मी.)


वनरक्षक भरती स्त्रियांकरिता शारीरिक पात्रता:

सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री उमेदवार किमान उंची – १५० (से.मी)
अनुसूचित जमाती प्रवर्गातील स्त्री उमेदवार किमान उंची १४५ (सेमी)


वरील प्रमाणे उमेदवारांना वनरक्षक भरती महाराष्ट्र(Vanrakshak Bharti Maharashtra) अंतर्गत शारीरिक पात्रतेच्या नुसार त्यांची उंची तसेच छाती व वजन इत्यादी पात्रता पूर्ण केलेले असावे लागतात. शारीरिक भरती संदर्भातील संपूर्ण पात्रता भरतीच्या अधिकृत जाहिराती प्रमाणे असेल याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. शारीरिक पात्रते संदर्भात अधिक माहिती करिता भरतीची अधिकृत जाहिरात वाचावी.

वनरक्षक भरती वयोमर्यादा vanrakshak age limit maharashtra

मित्रांनो वनरक्षक भरती संदर्भात शैक्षणिक तसेच शारीरिक पात्रता आपण जाणून घेतलेली आहे यांच्याबरोबरच वयोमर्यादा सुद्धा महत्त्वाची असते. त्यामुळे आता आपण वनरक्षक भरतीची वयोमर्यादा जाणून घेऊया.

भरतीच्या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची जी अंतिम तारीख असेल त्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त 25 ही मर्यादा आहे. उमेदवार हा 25 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जर मागासवर्गीय प्रवर्गांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली तर त्या संदर्भात माहिती जाहिरातीत नमूद करण्यात येईल. वयोमर्यादेच्या अधिक माहिती करिता भरतीची अधिकृत जाहिरात वाचावी.

 

वनरक्षकाला वेतन किती असते?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने वनरक्षक(Vanrakshak) हे पद असून राज्यात वनरक्षकाला सहाव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन हे 5200 ते जास्तीत जास्त 22000 रुपये आणि ग्रेड पे 1800 रुपये असते. वनरक्षकाच्या वेतनासंदर्भात विस्तृत माहिती ज्यावेळेस जाहिरात निघेल त्यावेळेस नोटिफिकेशन मध्ये नमूद करण्यात येईल.
 

वनरक्षक भरती 2023 कधी निघणार?

वनरक्षक भरती 2023 ही जानेवारी 2023 मध्ये निघणार आहे.
 

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण वनरक्षक भरतीच्या सर्व पात्रता तसेच वयोमर्यादा आणि वनरक्षकाची वेतन या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण नोकरीविषयक आणि भरती विषयक माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment