बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिप कशी मिळवायची? How to get Bisleri Distributorship?

कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असल्यास मार्केटमध्ये ट्रेडींग मध्ये असलेला कोणताही व्यवसाय करायचा असतो. आपण आपल्या स्वतःचा एक व्यवसाय ओपन करू शकतो किंवा एखाद्या कंपनीची डिस्ट्रीब्यूटर शिप किंवा डीलरशिप घेऊन सुद्धा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. आज आपण बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिप कशी मिळवायची? How to get Bisleri Distributorship? याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

बिस्लेरी कंपनी बद्दल माहिती Bisleri Company Information in Marathi

मित्रांनो हा लेख वाचत असणाऱ्या प्रत्येकाने बिसलेरी(Bisleri) हे नाव ऐकलेच असेल. आपण प्रवास करत असताना अनेक वेळा आपण बिसलेरीतील पाणी पिलेलं आहोत. पण कधी विचार केला का? ही बिस्लेरी कंपनी कोणत्या देशातील असेल. या बिस्लेरी कंपनीचा व्यवसाय किती देशांमध्ये चालत असेल. बिसलेरी ही एक इटालियन कंपनी आहे. बिसलेरी कंपनीची स्थापना 1965 मध्ये करण्यात आलेली होती. सिग्नल पॅलेस बिस्लेरी या उद्योजकाने ही कंपनी विकत घेतलेली आहे. बिस्लेरी कंपनी जवळपास 135 देशांमध्ये आपला व्यवसाय करत आहे. त्यांची प्रोडक्ट मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहे. बिसलेरी हा एक मोठा ब्रँड बनलेला आहे. आपण प्रवास करत असताना आपल्याला पाण्याची आवश्यकता असल्यास आपण समोरच्याला बिसलेरी आहे का? असे विचारतो यावरूनच आपल्याला समजते की हा किती मोठा ब्रँड बनलेला आहे.

 

बिसलेरी या कंपनीचे नेटवर्क खूप मोठे आहे, सर्वत्र विस्तारलेले आहे. बिसलेरी कंपनीने त्यांचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुद्धा सुरू केलेला आहे. आणि या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत बिसलेरी कंपनी अनेक प्रकारची उत्पादने ऑनलाइन पद्धतीने विकत आहे. बिसलेरी कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देखील बोलावता येतात.Bisleri Company Information in Marathi

 

जर आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर बिस्लेरीची (Bisleri) डिस्ट्रीब्यूटर शिप हा व्यवसाय तुम्ही विचारात घेऊ शकतात. बिसलेरी बिस्लेरीची (Bisleri) डिस्ट्रीब्यूटर शिप घेऊन आपण लाखो रुपये कमवू शकतात. हा एक फायदेशीर व्यवसाय आपल्याला करता येतो. बिसलेरी डिस्ट्रीब्यूटर शिप मिळण्याकरिता आपल्याला खर्च हा जास्त येतो. बिसलेरी हा एक मोठा ब्रँड असल्यामुळे त्याचप्रमाणे आपण डिस्ट्रीब्यूटर शिप मिळत असल्यामुळे आपल्याला फी आकारला जाऊ शकते. बिसलेरी डिस्ट्रिब्युटरशिप करिता येणारा खर्च हा शहरानुसार ठरू शकतो. जशी की छोट्या शहरा करिता डिस्ट्रीब्यूटर शिप मिळवली तर कमी खर्च व मोठा शहर असेल तर जास्त खर्च येऊ शकतो. बिसलेरी डिस्ट्रीब्यूटर शिकण्याकरिता आपल्याला दहा ते पंधरा लाख रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो. Bisleri Company in Marathi

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन हा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. भारत सरकार बिसलेरी डिस्ट्रीब्यूटर शिप या व्यवसायाकरिता मुद्रा कर्ज पुरविते.

 

बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिपसाठी अर्ज प्रक्रिया Application Process for Bisleri Distributorship

बिसलेरी डिस्ट्रीब्यूटर शिप (Bisleri Distributorship) मिळवण्याकरिता आपण दोन प्रकारे अर्ज करू शकतो पहिला प्रकार म्हणजे बिसलेरीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे. दुसरा अर्ज प्रकार म्हणजे बिसलेरी कंपनीचे प्रतिनिधीशी संपर्क साधून सर्व माहिती जाणून घेऊन औपचारिकता पूर्ण करून अर्ज करणे. आता आपण बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिपसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया.

1. सर्व प्रथम बिस्लेरी या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.

Official website – 

2. या कंपनीच्या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला संपर्क हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

3. आता कंपनीला संपर्क साधण्याकरिता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर व तुमचे नाव तसेच तुमचे ठिकाण व सर्व माहिती व इतर तपशील भरून तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे.

4. तुम्ही हा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती कंपनीकडे जाते.

5. त्यानंतर कंपनीचे अधिकारी तुमच्या सोबत संपर्क करतील व पुढील प्रक्रिया साठी मार्गदर्शन करतील.

 

बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे Required Documents for Bisleri Distributorship

बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिप मिळण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. Bisleri Distributorship Mahiti Marathi

1. ओळखीचा पुरावा- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड

2. बँक पासबुक

3. स्वतःचा ईमेल आयडी

4. मोबाईल नंबर

5. पत्त्याचा पुरावा- रेशन कार्ड, वीज बिल

6. पासपोर्ट साईज चे फोटो

7. जीएसटी क्रमांक

8. मालमत्ता दस्तऐवज

9. जमिनी संबंधित सर्व कागदपत्रे

10. सर्व प्रकारचे ना हरकत दाखले

वरील सर्व कागदपत्रे ही आपल्याला बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिपसाठी आवश्यक आहेत.

 

ग्रामीण भागासाठी 10 व्यवसाय कल्पना ज्या देतील खूप जास्त नफा 

बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिप मिळाल्यानंतर प्रक्रिया:-

जर तुम्हाला बिसलेरी(Bisleri) या कंपनीतर्फे डिस्ट्रीब्यूटर शिप मिळाली तर तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवावे लागेल. बिसलेरी कंपनी पाणी पाऊच तसेच पाणी बॉटल असे प्रॉडक्ट बनविते. आता तुम्ही बिसलेरी कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर आहात त्यामुळे तुम्हाला स्टाफ ची आवश्यकता आहे. कामाचा अनुभव असलेले व प्रशिक्षित असलेले पाच ते सात कर्मचारी तुम्हाला कामावर ठेवावे लागेल.

 

बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिप संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा, अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment